Thursday, April 30 2026 12:00 pm

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील खासदारांना विशेष आमंत्रण

दिल्ली 13 भारताच्या राष्ट्रपती महामहिम मा .श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील खासदारांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरातचेही खासदार यावेळी उपस्थित होते. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हेही यावेळी उपस्थित होते. सर्व खासदारांमध्ये समन्वय असावा, एकमेकांशी संवाद व्हावा या हेतूने राष्ट्रपतींनी सर्वांना आमंत्रित केले होते. यावेळी खासदारांसमवेत राष्ट्रपतींनीअल्पोपहार केला. सर्व खासदारांनी राष्ट्रपतींना यावेळी शुभेच्छा दिल्या.