Saturday, June 27 2026 10:37 pm
latest

webxine_admin

380 Posts

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा – मंत्री डॉ. अशोक वुईके

अमरावती, 22 : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासीबहुल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळे

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या; मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, 22 – सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वीजे

पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री मकरंद पाटील

बुलढाणा, 22: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक

पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, 22 : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ३ ठिकाणी धाड, ९ सिलेंडर जप्त

सांगली, 22: सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत आहे. या पथकांमार्फत 3 ठिकाणांवर धाड

यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

संभाव्य पूरस्थिती, एल निनोच्या अनुषंगाने टंचाईस्थितीचा घेतला आढावा कोणत्याही परिस्थितीत मदत व बचावासाठी तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश सांगली, 22 : जिल्ह्यात मान्सून कालावधीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूरस्थितीत तसेच, एल निनोच्या

जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय – सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स

मुंबई, 22 : सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस

जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ

मुंबई, 22 : राज्यातील दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील रस्ता अपघात मृत्युदरात लक्षणीय घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांचे यश

मुंबई, 22 : महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कठोर आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, राज्यातील प्राणघातक अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात

डॉ. राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, 22 : मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा