Thursday, May 14 2026 6:18 pm

राष्ट्रवादी (श.प.) च्या ओबीसी सेल अध्यक्षपदी गजानन चौधरी यांची फेरनिवड

ठाणे, 14 – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून गजानन चौधरी यांची ओबीसी सेलच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

गजानन चौधरी यांना ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी बुधवारी नियुक्तीपत्र दिले.

गजानन चौधरी हे शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. ओबीसी विशेषतः आगरी – कोळी समाजात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यानेच पुन्हा त्यांची निवड करण्यात आली असल्याचे राज राजापूरकर यांनी सांगितले. तर, आपली फेरनिवड झाल्याने नवीन ऊर्जा संचारली असून आपण ओबीसी समाजाला पक्षाशी जोडणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, ओबीसी सेलच्या महिलाध्यक्षपदी मनिषा पाटील, कोपरी – पाचपाखाडी अध्यक्ष प्रशांत उदमाने, ठाणे विधानसभा अध्यक्ष मंगेश वाघे, कळवा – मुंब्रा अध्यक्ष मन्सूर डोसानी, प्रभाग क्र.3 अध्यक्ष कल्पेश भिमरा, वार्ड क्रमांक 1 जयवंत भोईर आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.