ठाणे, 01 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, राज्यातील शेतकऱ्यासाठी एक अभिनव व तंत्रज्ञानाधारित उपक्रम डिजिटल शेतीशाळा – सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमाचे पहिले सत्र दि.१ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान माहिती व मार्गदर्शन मोबाईलद्वारे थेट घरापर्यत पोहोचवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सत्र 1 चा विषय : पेरणीपूर्व तंत्रज्ञान:- या पहिल्या सत्रात हवामान अनुकूल पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. यात पुढील विषयांचा समावेश असेल. बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, शून्य मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया.
सहभागी व्हा!
राज्यातील सर्व शेतकरी, शेतकरी गट, कृषीताई, FPO’S, SHG’s आणि ग्रामीण महिला बचत गट यानी या डिजिटल शेतीशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ही शेतीशाळा YouTube च्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाईल. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या YouTube लिंकपैकी कोणत्याही एकावर क्लिक करा.
YouTube जॉइनिंग लिंक्स
महाराष्ट्र शासन कृषी विभाग- https://www.youtube.com/@AgricultureDepartmentGoM.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) –
https://www.youtube.com/@PoCRAMaharashtra/streams
पाणी फाऊंडेशन – https://www.youtube.com/@Paani Foundation/live
UMED – महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान –
https://www.youtube.com/@Mission UMED
अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
