ठाणे 13 : राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मनिष जोशी, गटनेते पवन कदम, शिवसेना प्रवक्ता राहूल लोंढे, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका मालती पाटील, अमिषा पाटील, चंद्रकांता साळवी आदी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान खासदार ज्योती वाघमारे यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासमवेत ठाणे शहराच्या विकासासंदर्भातील विविध प्रकल्प तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राबविण्यात येणारे उपक्रम या विषयांवर त्यांनी चर्चा केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे समवेतही त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत संवाद साधला.
