Sunday, June 21 2026 1:49 am
latest

सहाव्या वित्त आयोगाकडून राज्यपालांना अहवाल सादर

मुंबई, 19 : राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आज सादर केला.

आयोगाचे सदस्य डॉ. के. एच. गोविंदराज, एकनाथ डवले, प्रा. एस. चंद्रशेखर तसेच सदस्य सचिव शन्मुगराजन एस. यावेळी उपस्थित होते.

पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याबाबत शिफारसी करणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे.

०००