Tuesday, February 17 2026 1:20 am

मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

 

ठाणे, 16: माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण प्रदेश, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून ग्रस्तोदित स्थितीत दिसणार आहे. म्हणजे ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार असल्याचे दा.कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.