Sunday, June 21 2026 12:37 pm
latest

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले..सलग दुसऱ्या दिवशीही ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर ठामपाचा हातोडा..

ठाणे 09 – ठाणे मुख्यालयाच्या माध्यमातुन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाने अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे आणि अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत प्रत्येक प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामावर कालपासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आज दिवा आणि कळवा भागातील अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली.. यात दिवा येथील खान कंपाऊंड दोस्ती प्लॅनेट समोरील मोहम्मद सिद्दीकी चौधरी यांच्या तर कळवा प्रभाग समितीतील कुंभार आळी येथील शिवप्रसाद यादव, गावदेवी मंदिराजवळ सतीश सित्रे, टकले वाडी येथील सतीश सावंत, जामा मशीद जवळ संतोष राठोड , गावदेवी मंदिराजवळ अहमद महमद ख्वाजा शेख यांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली

महापालिकेच्या सर्व नऊ प्रभाग समित्यांमध्ये सर्व समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत ही कारवाई अशीच सुरू राहणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याचे महेश आहेर यांनी यावेळी सांगितले.