Sunday, August 30 2026 5:46 am

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव नागपूर, 18 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह

राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळाच्या नूतनीकरणासाठी आराखडा तयार करावा– मंत्री उदय सामंत

नागपूर, 18 : नागपूर सुधार प्रन्यास मार्फत नागपूर शहराचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधीस्थळाचे जतन आणि परिसराचे नूतनीकरणासंदर्भात प्रन्यासच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती

तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना– मंत्री संजय राठोड

नागपूर, 18 : मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याबाबत अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा आणि

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून मंजुरी – मंत्री उदय सामंत

नागपूर, 18 : नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करून त्यास मंजुरी देण्यात येईल तसेच महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यास आणि त्यात समाविष्ट होण्यास लगतच्या गावांची तयारी असेल तर

तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाची सचिवांमार्फत चौकशी करणार – मंत्री अतुल सावे

नागपूर, 18 : राज्यात सुरू असलेल्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपाची सचिवांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी

जलजीवन मिशनच्या कामांसाठी देखरेख समिती – मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर, 18 : जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख समिती नेमणार असल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत केली. सदस्य सुनील शेळके यांनी

गोरेगावातील जय भवानी सोसायटीच्या रहिवाश्यांची १५ दिवसांत निवास व्यवस्था करणार– मंत्री अतुल सावे

नागपूर, 18 : मुंबई उपनगरातील गोरेगाव येथील जय भवानी एसआरए गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाश्यांची १५ दिवसात निवास व्यवस्था केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य विद्या ठाकूर

एसआरएच्या सदनिका विकण्याची मुदत मर्यादा कमी करणार-गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

नागपूर, 18 झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी

कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील सदनिका प्रकल्पबाधितांकरिता देण्याबाबत मार्ग काढू- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

नागपूर, 18 : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील (एसआरए) बाधितांसाठी कायमस्वरूपी संक्रमण शिबिरांची (पीटीसी) आवश्यकता असते. एमएमआरडीए, महानगरपालिका आदी यंत्रणांच्या विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांसाठी (पीएपी) देखील सदनिकांची आवश्यकता आहे. तथापि एसआरएला

वाळूजमधील भूसंपादन आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल– मंत्री उदय सामंत

नागपूर,18- सिडको महामंडळाच्या वाळूज (छत्रपती संभाजीनगर) प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 मार्च 2023 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वाळूज प्रकल्पामधील आवश्यक जमिनीचे संपादन आणि सद्यस्थितीबाबत लोकप्रतिनिधींच्या मागण्या