Thursday, June 25 2026 2:53 pm
latest

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी‘ यांच्या नावाने जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान विकसित करणार –वने मंत्री गणेश नाईक

मुंबई, 25 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी’ यांच्या नावाने जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात येणार आहे असे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, बच्चू कडू, राजहंस सिंह, प्रमोद जठार, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

मंत्री नाईक म्हणाले, सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या तिलारी खोरे, दोडामार्ग भागात वनताराच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव पार्क विकसित करण्यात येईल.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करण्याबाबत झालेल्या मागणीच्या अनुषंगाने उपस्थित बाबीवर शासन कारवाई करून बाब वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार विधि ग्राह्य नसल्याने दप्तरी दाखल करण्यात आले असे स्पष्ट नमूद केले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आदिवासी पाड्यांमधील वस्त्यात राहणाऱ्या न्यायालयाच्या पात्रतेनुसार लाभार्थी ठरलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी 300 एकर जागेवर संजय गांधी उद्यानातील लगतच्या शेतकऱ्यांची जागा उपलब्ध करून घेऊन त्यांना अतिरिक्त टीडीआर देण्यात येत असून इमारती असलेली वसाहत केली जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील आदिवासी समाजातील गरजू लोकांचे वसाहतीमध्ये पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत सध्या आहे त्या वस्त्यांमध्ये त्यांना पिण्याच्या पाण्यासह अन्य नागरी सुविधा पुरविण्यात येतील, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.