मुंबई, 03 : मौजे विकासवाडी ते कळंबरेकी (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथील सिमेंट रस्त्याचे काम जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. या कामात अनियमितता झाल्याचे आढळल्यास चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य नाना पटोले यांनी विकासवाडी ते कळंबरेकी येथील सिमेंट रस्त्याच्या बांधकामात झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री डॉ. वुईके यांनी ही माहिती दिली.
मंत्री म्हणाले की, विकासवाडी–कळंबरेकी गावातील हा रस्ता जिल्हा नियोजन व विकास परिषद (डीपीडीसी) योजनेतून करण्यात आला आहे. तथापि, या कामाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
