Wednesday, June 24 2026 2:48 pm

नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, 24 : विधान परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधान परिषदेमधील सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित सदस्य प्राजक्त प्रसादराव तनपुरे, रवींद्र सदाशिव फाटक, अनिकेत सुनील तटकरे, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज माधवराव पाटील, प्रवीण रामचंद्र पोटे-पाटील, अमरनाथ अनंतराव राजूरकर, राजेंद्र विठ्ठल राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचे सभागृहात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.