Tuesday, June 2 2026 4:49 am

जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची सुद्धा!

हिंदू जनआक्रोश सभेत आमदार संजय केळकर यांची गर्जना

ठाणे 01: राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची-आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.

आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शाह यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे ३१ मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचे आयोजन केले होते. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थित हिंदुजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभला आहे. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केले नाही. आपण कुणाला छेडत नाही, पण कोणी आपल्याला छेडले तर त्याला सोडायचे नाही. असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.

राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून, कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडले जात आहे, त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची-आमची, हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावे लागेल, असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.

पश्चिम बंगालमध्ये ३०० हिंदू बांधवांनी प्राणांची आहुती दिली, आणि वोट जिहाद संपवला. जय श्रीरामचा नारा दिल्यानंतर घराघरातून हिंदू मतदार बाहेर पडला आणि २००च्या वर भाजपचे आमदार निवडून आले. ठाण्यात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केली आहे. फेरीवाल्यांचा व्यवसाय करत आहेत. त्यांना वेळीच हाकलण्याची जबाबदारी आपली आहे. मी या विरोधात काम सुरू केले आहे. प्रशासनाने त्यांचे काम केले नाही तर त्यांच्या मानगुटीवर बसून आपण यांना हाकलून द्यायचे आहे. येऊरच्या डोंगरात देशाच्या संरक्षणासाठी एअर फोर्स स्टेशन आहे. मात्र आजूबाजूला अनधिकृत बांधकामे करून या स्टेशनला धोका निर्माण झाला आहे. या बाबत माझा शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हे बांधकाम साफ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले. मी आधी कारसेवक होतो आणि आता जनसेवक आहे असे सांगताना त्यांनी कारसेवक असल्याचा अभिमान आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

जगद्गुरु परमहंस आचार्य हिंदुजनांना संबोधित करताना म्हणाले, मी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अयोध्यातून आलो आहे ते फक्त हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आणि हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगीबाबा हे असा न्याय करतात की गुन्हेगार पुन्हा गुन्हे करण्याचा प्रयत्न करत नाही. भारतात कुठेही लव जिहाद होणार नाही याची सनातन हिंदू धर्माने काळजी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदू जन आक्रोश सभेला भाजपाचे स्थानिक नगरसेवक नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक विकास पाटील, करण जैन, कैलास म्हात्रे, अमित मिश्रा, बीपीन पांडे, भाजपा महिला अध्यक्ष स्वप्नाली साळवी, सीमा वैष्णवी, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी तसेच सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.