Thursday, March 5 2026 4:20 pm

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आजपासून ठाण्यात सुरू होणार छायाचित्र प्रदर्शन

ठाणे (16) : – जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने (१९ ऑगस्ट) ’ठाणे महानगरपालिका’ आणि ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने’,ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आजपासून (17 ऑगस्ट) पासून सुरू झाले असून सदर प्रदर्शन 20 ऑगस्ट 2024 पर्यत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेतील विजेते ठरलेल्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश देखील या प्रदर्शनात करण्यात आला असून ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

तीन हात नाका येथील हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भरविण्यात आले असून 20 ऑगस्टपर्यत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सदरचे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांमध्ये सदरची स्पर्धा घेण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ‘Wild Life’ या विषयात प्रथम पारितोषिक हिरा पंजाबी, द्वितीय संदीप यादव, तृतीय लाझरस पॉल यांनी तर उ्ततेजनार्थ पारितोषिक हिरा पंजाबी आणि बिजू बोरो यांना प्राप्त झाले आहे.’Performing Art’, या विषयामध्ये प्रथम पारितोषिक गणेश नामदेव मेमाने, द्वितीय मनोज गोविंद मुसळे, तृतीय संजय बप्हाटे यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ क्रमांक शंतनु बोसे, अरुल डॅनम होरिझन यांना मिळाले.

‘Festival’, या विषयामध्ये प्रथम राकेश रावळ, द्वितीय शरद पाटील, तृतीय आकाश येवगे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक श्रवण तांडलिया व शंतनु दास यांनी पटकाविले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 50,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.25,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणार आहे.

राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘News Photo’ या विषयामध्ये प्रथम पारितोषिक सतेज शरद शिंदे, द्वितीय अरुल होरिझन, तृतीय अंशुमन पोयरेकर यांनी प्राप्त झाले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी व के.के. चौधरी यांनी पटकाविले. ‘Photo Features (story) या विषयात प्रथम पारितोषिक अमित चक्रवर्ती, द्वितीय नागोंडा पाटील, तृतीय सतीश विष्णु काळे यांनी पटकाविले आहे. ‘Wedding’, या विषयात प्रथम पारितोषिक धनराज उदयकांत कडलक, द्वितीय अश्पकाली किल्लेकर, तृतीय शादाब खान यांनी पटकाविला असून उत्तेजनार्थ पारितोषिक सौरभ नाझरे, अनिकेत गुरव यांना प्राप्त झाले आहे. राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी 25,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु.20,000/ तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणारआहे.

जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘Monsoon या विषयात प्रथम पारितोषिक राकेश रावळ, द्वितीय के.के. चौधरी, तृतीय निलेश पाष्टे यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दिपक जोशी, के.के. चौधरी यांना प्राप्त झाले आहे. ‘Thane News 24’ या विषयात प्रथम पारितोषिक सचिन देशमाने, द्वितीय प्रफुल्ल गांगुर्डे यांनी पटकाविले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेतील दोन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु. 20,000/- द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 15,000/- तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु. 3,000/- देण्यात येणार आहे.

तसेच महाविद्यालयीन तरुणतरुणींसाठी ‘Reflection’ हा विषय ठेवण्यात आला होता, मोबाईलच्या माध्यमातून सदरची छायाचित्रे पाठविण्यात आली होती. यामध्ये प्रथम पारितोषिक महेश आंब्रे, द्वितीय सई चासकर तृतीय शिवाजी धुते यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक कौशिक व पियूष पाष्टे यांनी पटकाविले आहे. तर ‘Daily Life’ या विषयात प्रथम पारितोषिक शादाब खान, द्वितीय शंतनु बोसे, तृतीय कुणाल गव्हाने यांनी पटकाविले असून उत्तेजनार्थ पारितोषिक हिमांशु मेस्त्री व निखिल पांचाल यांनी पटकाविले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी रु.20,000/- द्वितीय क्रमांसाठी प्रत्येकी रु. 15,000/-तृतीय क्रमाकांसाठी रु. 10,000/- तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी रु.3,000/- देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.