Tuesday, March 10 2026 7:25 am

शट डाऊन पुढे ढकलण्यात आल्याने पाणी पुरवठा नियमितपणे होणार

ठाणे (३०) : महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने दि. ३० मे रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे दुरूस्तीसाठी घेतलेला शटडाऊन काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलला असल्याचे कळवले आहे. त्यामुळे, या काळातील ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे इस्टेटचा काही भाग येथे बाधित होणारा पाणी पुरवठा आता नियमितपणे सुरू राहणार आहे.

दुरुस्तीसाठीचा शटडाऊन आता मंगळवार, ०४ जून रोजी रात्री १२.०० ते बुधवार, ०५ जून रोजी रात्री १२.०० या काळात घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने कळवले आहे.