Thursday, February 5 2026 9:35 pm

नवी मुंबई मनसे मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातून   मनसैनिकांनी फुंकले नरेश म्हस्के यांच्या विजयाचे रणशिंग  

नवी मुंबई,16 – ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयाचे रणशिंग आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवी मुंबई मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातून कार्यकर्त्यांनी फुंकले.
सेक्टर-५० सीवूडस, नवी मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. महिला भगिनींनी नरेश म्हस्के यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, मनसे प्रवक्ते, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, सहसचिव अभिजीत देसाई, वाहतुक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, नवी मुंबई मनपा कामगार सेना  शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, अमोल आयवळे, योगेश शेटे, अनिकेत भोपी, भुषण कोळी, गणेश भवर, उमेश गायकवाड, सुहास मिंडे, विशाल चव्हाण, रोहन पाटील, नवी मुंबई महिला सेना शहर अध्यक्ष डॉ.आरती धुमाळ, उपशहर अध्यक्ष अनिथा नायडु, शहर सहसचिव सायली कांबळे, रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे यांच्यासह मनसे पदाधिकारी, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
अभिजित पानसे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, राज ठाकरे साहेबांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी मेहनत घ्यावी. नरेश म्हस्के यांचा विजय निश्चित असून विजयी मतांचे मताधिक्य वाढविण्यासाठी मनसैनिकांनी अजून ताकदीने प्रचार करावा.