Tuesday, June 23 2026 11:02 am

मनसेने पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीयांचा भाजपाला रामराम

ठाणे , 10 – मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी राजीनामानाट्य सुरू झाले आहे. मीरा भाईंदर येथील भाजपचे उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे ब्रिजेश तिवारी आणि त्यांच्यासोबत ४० ते ५० भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे शिवबंधन बांधून भगवा हाती घेतला.

राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाईंदर येथील उत्तर भारतीय लोक नाराज झाले असून आमच्या जखमा अजून ताज्या असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.