Tuesday, March 3 2026 10:48 am

ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे 21 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शळी टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे गुरूवार दि. 22/02/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दि.23/02/2024 रात्री 12.00 वाजेपर्यत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभागसमितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

तसेच सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.