Monday, June 1 2026 10:54 pm

सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत जगतातील देव्हारा रिकामा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, १ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रसिद्ध गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यात माधुर्य होते, तरल भाव होता व पावित्र्य होते. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत थेट हृदयाला भिडणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे, अशीच सर्वांची भावना आहे. त्यांचे संगीत अजरामर आहे. राज्यातील जनतेच्या; तसेच संगीत रसिकांच्या वतीने मी दिवंगत सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.