Saturday, July 4 2026 8:34 am
latest

बिश्नोई गँगकडून विधिमंडळ सदस्याला धमकी प्रकरणी चौकशी करून आवश्यकतेनुसार संरक्षण द्या – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई, 03: बिश्नोई गँगकडून विधिमंडळ सदस्यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी तसेच आवश्यकतेनुसार संबंधित सदस्यांना सुरक्षा वाढविण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

विधानसभेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी शासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असल्याचे स्पष्ट केले. संबंधित सदस्यांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सुरक्षा वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.