Sunday, February 15 2026 5:31 pm

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

ठाणे 14 – 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या जवानांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी चंदनवाडी येथील शहीद उद्यानातील स्मारकात मानवंदना दिली. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.