Saturday, August 8 2026 8:58 pm

ठाण्यातील पारसिक नगर मध्ये साजरा करण्यात आला जागतिक योग दिवस

नागरिकांना दिले योगाचे धडे

नगरसेवक अभिजीत पवार यांच्या योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे 22 :- माणसाचे शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे माणूस त्रस्त आहे बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मानव देत असून यावर मात करण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक नगर येथे नगरसेवक अभिजीत पवार यांच्या माध्यमातून नागरिकांसोबत योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी कळवा पारसिक नगर येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या योग शिबिरात नागरिकांना विविध योगासनांचे धडे देण्यात आले. प्रत्येक योगासनाचे शरीरासाठी असणारे फायदे देखील नागरिकांना पटवून देण्यात आले. योगा फक्त योग दिना दिवशी न करता दैनंदिन जीवनात देखील योगासन करावे असे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजसेविका ऋता आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि नागरिक उपस्थित होते