Thursday, April 30 2026 12:44 am

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर एमआयडीसीतील एका कंपनीत स्फोट

एका मजुराचा मृत्यू, चार मजूर जखमी

बदलापूर,18 महाराष्ट्रातील बदलापूर खरवई एमआयडीसी एमआयडीसीमध्ये असलेल्या वीकी केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन भीषण आग लागली. कंपनीत चार ते पाच मोठे स्फोट झाले. या स्फोटाचे धक्के चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. या स्फोटात एका मजुराचा मृत्यू झाला तर चार मजूर गंभीर जखमी झाले. या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते, आधी या टेम्पोमध्ये केमिकलने आग लागली आणि नंतर आग कंपनीत पसरल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बदलापूर अंबरनाथ, अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.