Thursday, November 13 2025 10:46 am

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचा लोकमान्यनगरमध्ये पार पडला महिलांचा हळदीकुंकू समारंभ

ठाणे, १८ : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती तसेच मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ’महिला सेना विधानसभा प्रमुख“ सौ. परिषाताई सरनाईक यांच्या संकल्पनेतून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विविध ठिकाणी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य हळदी-कुंकू समारंभाचा शुभारंभ लोकमान्यनगर येथील डवलेनगर मैदानात दि. १७ जानेवारी, २०२३ रोजीच्या पूर्वसंध्येला करण्यात आला. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सुहासिनी महिलांनी वाण देऊन हळदी-कुंकू लुटले. सदरच्या कार्यक्रमात लकी-ड्रॉ द्वारे अनेक बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील दि. २० जानेवारी, २०२३ रोजी वसंतविहार-पवारनगर, दि. २१ जानेवारी, २०२३ रोजी घोडबंदर रोड, दि. २४ जानेवारी, २०२३ रोजी शिवाईनगर-वर्तकनगर महिलांसाठी भव्य हळदी-कुंकू समारंभ करण्यात येणार असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांना एकत्र आणून जास्तीत जास्त महिला उद्योजिका तयार करण्याची जबाबदारी पक्षाने पद देऊन माझ्यावर टाकली असल्यामुळे ते आव्हान आपल्या सर्व महिला कार्यकर्त्यांच्या मदतीने पेलण्याचा पर्यंत करणार, असे ’महिला सेना विधानसभा प्रमुख“ सौ. परिषाताई सरनाईक यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक आमदार श्री. प्रताप सरनाईक, युवासेना सचिव श्री. पुर्वेश सरनाईक, मा. उपमहापौर सौ. पल्लवी कदम, मा. नगरसेविका सौ. आशा डोंगरे, सौ. प्राजक्ता खाडे, विभागप्रमुख श्री. रामचंद्र गुरव, महिला आघाडी विभागसंघटिका सौ. टिना डिसोझा, सौ. वैभवी दळवी, सौ. राजेश्री बारटक्के, शाखासंघटक सौ. प्रीती तेरडे, सौ. आशा चव्हाण, सौ. शशी दाते, सौ. वंदना सूर्यवंशी, सौ. सुनंदा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.