Saturday, May 2 2026 9:29 pm

प्रभाग क्र. 19 मध्ये राबविण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

ठाणे, 26  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्र. 19 अंतर्गत हाजुरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेस उपायुक्त मधुकर बोडके, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, राजेंद्र फाटक, नगरसेव‍िका मीनल संख्ये, नम्रता भोसले, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे आदी उपस्थित होते.तसेच परिसरातील नागरिक देखील या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सकाळी 8.00 वा. प्रभाग क्र. 19 अंतर्गत संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, जीलानीवाडी, नयनवाडी चौक ते जे.के बेकरी, अर्जुना पार्क, नुरी रोड, ग्रीन रोड, पप्पू ढाबा ते सुर्वेवाडी, हनुमान मंदिर ते मस्जिद मार्गे एकवीरा देवी मंदिर परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर साचलेला रॅबिट कचरा, माती व अन्य घनकचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. तसेच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले.

महापालिकेचे सुमारे 150 कर्मचारी, फायलेरिया विभाग, गार्डन विभाग, मलनिस्सारण विभाग, 4 आर्यन वाहने, अतिक्रमण तसेच नौपाडा प्रभाग समितीचे लक्ष्मण पुरी यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला. अस्वच्छता करणाऱ्या तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन रु. 12,000/- इतका दंड वसूल करण्यात आला.

यावेळी उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी, प्रवीण बनोटे तसेच स्वच्छता निरीक्षक कांतीराम गायकर, लतीकेश गाडेकर, विशाल खांबे, पंकज साळवे, सुभाष जमधाडे, अमित मोते हे कर्मचारी उपस्थित होते.