अनगांव,17 विद्यार्थ्यांना शाळेय जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास त्यांना अभ्यासातील आणि सातत्यच यशापर्यंत घेऊन जाऊ शकते ,असे मत प्रमुख अतिथी अप्पर पोलिस आयुक्त डॉ पंजाबराव उगले यांनी भिंवडीतील शिशुविहार शिक्षणसंस्था संचालीत मा. दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणा प्रसंगी केले.
माझे शिक्षण देखिल मराठी शाळेत झाले आहे.प्लास्टिक पिशवीमध्ये दप्तर घेत होतो,अशा गरिब फरिस्थितीमध्ये मी शिक्षण घेवेन गरिबीवर मात केली, आताच्या शाळा या डिजीटल झाल्या आहेत. त्यावेळी या सूविधा नव्हत्या आपल्या शालेय जीवणातील आठवणींना उजाळा डॉ पंजाबराव उगले यांनी देऊन विद्यार्थ्यांनी सकारात्मक द्दष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.संगणक यूगाच्या स्पर्धेत यश संपादन करावयाचे असल्यास सातत्याने अभ्यासाची कास धरावी. अपयश आल्यास न डगमगता यशप्राप्तीसाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन अप्पर आयूक्त र्डॉ पंजाबराव उगले यांनी विद्यार्थ्यांना केले.
या वेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी डॉ शूभांगी पाटील, संस्थेचे अध्यक्ष यशवंत कानडे, उपाध्यक्ष शितल देशमुख, सचिव सूधिर देशमुख,मूख्याध्यापक दिपक लेले,आत्माराम वाघ ,स्नेहा कूळकर्णी,उपस्थित होते,
बालवाडी ते दहावीमध्ये प्रथम क्रमाक पटकावलेल्या गूणवंत विद्यार्थ्यांचा व दहावीमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गूणगौरव करण्यात आला.आदर्श विद्यार्थी पूरस्कार आर्यन ज्ञानेश्वर गोसावी, आदर्श विद्यार्थ्यांनी पूरस्कार श्र्वेता देवीदास नलावडे , नेशन बिल्डर शिक्षक पूरस्कार शाळेचे शिक्षक किशोर सापले,यांना देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सास्कूतीक कार्यक्रम सादर केले.विळास भोईर,सचिन कोळी,मनोहर गूरव,सूनिल पाटील, गणेश पाटील, स्वाती कदम,क्रांता धोंडाले ,शिक्षकांसह शाळेयव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले.
