Wednesday, June 24 2026 2:47 pm

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती जाहीर

मुंबई, 24 :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली.

सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील-चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.