Monday, June 1 2026 11:40 pm

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026

आजअखेर 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल;मंगळवारी छाननी

ठाणे,01 : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 ठाणे तथा पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आजअखेर एकूण 2 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
अभिजित अंकुश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. एकूण 2 उमेदवारांची आजच्या दिवशी एकूण 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उद्या मंगळवार,दि.2 जून रोजी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.