Thursday, February 5 2026 4:35 pm

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

सांगली, 05: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी घटनेतील जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. पालकमंत्र्यांनी अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, समित कदम, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.