Monday, December 22 2025 12:45 am
latest

अक्षतांजली उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय रोजगार मेळावा

ठाणे, 17 महाविद्यालयाचे दिवंगत अध्यक्ष व आधुनिक ठाणे शहरातील विविध वास्तूंचे शिल्पकार, मा. सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मृती निमित्ताने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून “अक्षतांजली” या स्व. सतीश प्रधान साहेबांना समर्पित उपक्रमांतर्गत दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे करण्यात येत आहे. ठाणे शहरासह संपूर्ण राज्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी व उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रोजगाराच्या सुवर्णसंधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात १०० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यामध्ये TCS, Wipro, Hexaware, Tech Mahindra यांसारख्या अग्रगण्य आयटी कंपन्यांसह HDFC Bank, SBI Bank यांसारख्या नामांकित बँकिंग संस्थांचा समावेश आहे.
एकूण १०० संस्थांपैकी –
१० संस्था आयटी क्षेत्रातील
०५ फार्मा कंपन्या
१५ विमा (इन्शुरन्स) क्षेत्रातील
१० ई-कॉमर्स क्षेत्रातील
१० बँकिंग क्षेत्रातील
०५ सुरक्षा (सिक्युरिटी) क्षेत्रातील
१५ बॅक ऑफिस क्षेत्रातील
३० BPO/KPO क्षेत्रातील संस्था सहभागी असतील.
या रोजगार मेळाव्यातील बहुतांश कंपन्या इंटर्नशिप, कायमस्वरूपी (Permanent) तसेच तात्पुरत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. १२ वी उत्तीर्ण, पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. कला, विज्ञान व वाणिज्य या सर्व शैक्षणिक शाखांतील विद्यार्थ्यांसाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना रेझ्युमे तयार करणे, कॉर्पोरेट शिष्टाचार तसेच मुलाखतीस सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या व उमेदवारांच्या करिअरसाठी हा मेळावा एक महत्त्वाचा व समाधानकारक टप्पा ठरेल.
महत्त्वाची बाब
हा राज्यस्तरीय रोजगार मेळावा संपूर्णपणे विनामूल्य असून,
1.कुठल्याही प्लेसमेंट पार्टनर कंपन्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
2.तसेच विद्यार्थी व उमेदवारांसाठीही सहभाग पूर्णपणे मोफत आहे.
पत्रकार परिषद
या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत –
मा. श्री. कमलेश प्रधान, अध्यक्ष, ज्ञानसाधना, ठाणे सोसायटी
डॉ. गणेश भागुरे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
डॉ. उषावती शेट्टी, संचालिका, C4Cynergy
श्री. सचिन तेलवणे, संचालक, लिओ क्लब
यांनी रोजगार मेळाव्याच्या उद्देश, स्वरूप व विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची माहिती:
दिनांक: २० डिसेंबर २०२५
वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.००
स्थळ: सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे