Monday, December 22 2025 1:03 am
latest

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई, 21 : मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव अजित देशमुख, हवेली तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने, मंडळ अधिकारी मिलिंद सेठी, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील आंबेकर उपस्थित होते.

मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील स.न. ४४, एकूण क्षेत्र ५ हेक्टर ९१ आर जमिनीच्या मिळकतीबाबतचे निवेदन प्राप्त झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून, तक्रारकर्त्यांनी मांडलेल्या सर्व आक्षेपांसंदर्भात सविस्तर तपास अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले. हवेली तालुक्यातील जमीन बेकायदेशीर ताब्यात घेतल्यासंदर्भात सात दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपाध्यक्ष बनसोडे अधिकाऱ्यांना दिले.