Monday, December 22 2025 3:23 am
latest

मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांना श्रद्धांजली

मुंबई, 21 : मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही दिवंगत शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी राजेंद्र शिंदे यांचे बुधवारी (दि.१९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी आदींनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगी संपूर्ण सचिवालय शिंदे कुटुंबाच्या पाठिशी असल्याची भावना व्यक्त केली.