Sunday, March 8 2026 12:52 am

ठाणे ते वडपे रस्त्याचे काँक्रिटीकरण २०२५ पर्यंत करण्यात येणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 11: मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते वडपे दरम्यान 23 किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण 2025 पर्यंत करण्यात येणार असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबतचा प्रश्न सदस्य अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य हिरामण खोसकर, रईस शेख यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री भुसे म्हणाले की, वडपे ते ठाणे या रस्त्याच्या कामाचे त्रयस्थ ऑडिट करण्यासाठी व्ही.जे.टी.आय. या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून या संस्थेच्या अहवालातील निष्कर्षानुसार कार्यवाही करण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण भागात गोदामाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कंटेनरची वाहतूक अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने संबधित विभागाला सूचना केल्या असून ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल.

ना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सर्व महानगरपालिकांचे ऑडिट रिपोर्ट आलेले आहेत.