Monday, December 22 2025 3:12 am
latest

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

पॅरिस, 24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या श्री. शर्मा यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपले महाराज राजे शिवछत्रपती यांच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे, असे मंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे. त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही ॲड.शेलार यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.