Monday, December 22 2025 3:19 pm
latest

सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना पाठिंबा…

ठाणे, 14 -भारतीय जनता पक्षाचे ठाण्यातील विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांना सकल ब्राम्हण समाजाकडून संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. इतर समाजप्रमाणे ब्राम्हण समाजाने याबाबत पत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.
हिंदुत्वाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन अधिक सकारात्मक काम करणारा राष्ट्रसमर्पित असलेला देश परदेशातील आमचा ब्राह्मण समाज आहे. या समाजाप्रती अत्यंत चांगली अशी सकारात्मक वागणूक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यात सुरवातीला खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळ दिले तर नुकतेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र महामंडळ देखील दिले आहे ह्याची सार्थ जाणीव आम्हा सर्वांना आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ब्राह्मण समाजाने कायमच हिंदुत्ववादी पक्षाला साथ दिली आहे. राज्याचे सध्याचे सामाजिक व राजकीय वातावरण पाहता हिंदुत्वाचा मुद्दा भाजप व मित्रपक्ष यांनी केंद्रस्थानी ठेवला आहे व ब्राह्मण समाजाची देखील हीच भूमिका आहे. त्यानुसाठी सर्व ब्राह्मण संस्था, संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख -महाराष्ट्र ब्राह्मण सभा अनिकेत रवींद्र वालावलकर, अध्यक्ष-ब्राह्मण सेवा संघ, सोलापूर शशांक गोविंद दडपे, विलास पुरुषोत्तम साने (माजी सचिव – ब्राह्मण सेवा संघ , ठाणे ), अमित जयंत गोखले, ⁠श्रीखर जनार्धन वैद्य आदी विविध ब्राह्मण समाजातील व्यक्ती उपस्थित होते.