Friday, May 8 2026 2:46 pm

ठाणे जिल्ह्यातील 139 ते 143 विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरिक्षक म्हणून आशीषकुमार पांडेय यांची नियुक्ती

ठाणे,02:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगाने 139-मुरबाड, 140-अंबरनाथ, 141-उल्हासनगर, 142-कल्याण (पूर्व) व 143-डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरिक्षक म्हणून श्री.आशीषकुमार पांडेय (भा.रा.से.) यांची नियुक्ती केलेली आहे.
139-मुरबाड, 140-अंबरनाथ, 141-उल्हासनगर, 142-कल्याण (पूर्व) व 143-डोंबिवली या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाविषयक नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे expenobs139to143@gmail.com या ई-मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा खर्च निरिक्षक, श्री.आशीषकुमार पांडेय (भा.रा.से.) यांना कुंजविहार, सेंच्यूरी रेयॉन गेस्ट हाऊस, शहाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात.