Sunday, June 21 2026 11:59 am
latest

२० मे रोजी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन

ठाणे, २9 : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले.

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आज राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात मतदानाची जनजागृती करणारा फलक लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त्‍ आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त्‍ जी.जी. गोदेपुरे, तुषार पवार उपस्थित होते.

लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस हा सोमवार असून शनिवार रविवार जोडून सुट्टया जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे.