Monday, April 20 2026 10:49 am

राणादा आणि पाठकबाई अडकले विवाह बंधनात

पुणे : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज (शुक्रवार २ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत. सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.
अक्षया-हार्दिकचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकने विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नासाठी अक्षयाने खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर धोतरमध्ये हार्दिकही राजबिंडा दिसत होता.गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जय्य्त तयारी सुरू होती. मेहंदी, हळदी व संगीत सोहळ्यातील फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा>> तेजस्विनी लोणारी