Tuesday, March 31 2026 1:52 am

[3:05 pm, 30/3/2026] Amol Surve: रस्ते अपघातात मयत व्यक्तीच्या अवयवदानाने ९ जणांना मिळाले जीवनदान
*महावीर जैन हॉस्पिटलचा पुढाकार *
ठाणे 30 –  रस्ते अपघातात एका ३३ वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयव दानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतला. सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील ९ जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राजदेरकर आणि डॉक्टरची टीम उपस्थित होती.
२९ मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एक ३३ वर्षीय व्यक्तीचे रस्ते अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्याच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हदय, २ किडनी, लिव्हर, पॅक्ट्रिया, कॉर्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे दोन पार्ट करण्यात आले. त्याला स्प्लीट लिव्हर असे म्हणतात. केईम आणि अपोलो हॉस्पिटल असे दोन ठिकाणी पाठविण्यात आले. यात विशेष म्हणजे ९ वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लाट करण्यात यश आले. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे २४ तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अववय ९ रुग्णांना तातडीने प्रत्यारोपण केल्याचे त्या त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ४० डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. 
ब्रेन डेडबाबत डॉक्टरांनी सांगितले की १०० टक्के ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईंकांकडून स्विकृती घेवूनच रुग्णाला मृत घोषित केले जाते. यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. सदर अवयव दान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सहीयारा बोन बँक येथे विविध अवयव पाठविण्यात आले. अवयव दानात सर्वाधिक मागणी किडणीला ट्रान्सपार्टला असून जवळजवळ ६० ते ७० हजार रुग्ण प्रतिक्षेत  आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात. लाखो पेशंट हे अवयवासाठी प्रतिक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरविण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते.
महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरविण्यात येते. रुग्णांच्या सेवेसाठी आमचे रुग्णालय सज्ज आहे. आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. अवयव दान ही चळवळ असून ती अधिक वाढविण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब – गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेने येथे येवून नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावे, असा आमचा प्रयत्न आहे.