Monday, December 22 2025 10:24 am
latest

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीत ग्रंथप्रदर्शन

नवी दिल्ली, 19: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिल्लीतील वाचकवर्गांसाठी निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानने नवीन महाराष्ट्र सदनात 19 ते 21 जानेवारी 2024 पर्यंत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात रसिक साहित्य प्रा.लि., पॉप्युलर प्रकाशन, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, डायमंड बुक्स आणि भारतीय साहित्य कला प्रकाशन या संस्था सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात विविध भाषांमधील साहित्य, बालसाहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतील.

या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता निवासी आयुक्त कार्यालयाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या ग्रंथप्रदर्शनाला दिल्लीतील सर्व वाचकवर्गांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत राहील.