Thursday, August 27 2026 11:05 am

सिडको परिसरातील तलावांचे पुन्हा सर्वेक्षण – मंत्री उदय सामंत

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
मुंबई, 29 : सिडको परिसरातील तलावांमधील पाणी प्रदूषणाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत (एमपीसीबी) परिसरातील सर्व तलावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत सदस्य विक्रांत पाटील यांनी लक्षवेधी सूचना यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत म्हणाले, एमपीसीबीमार्फत सिडको परिसरातील सर्व तलावांचे नव्याने सर्वेक्षण करून पाणी प्रदूषणाची कारणे शोधून त्याबाबत स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील. चौकशी अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.