Sunday, December 21 2025 11:29 pm
latest

विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत

मोठी बातमी! विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा दुर्दैवी अंत

नेपाळ, १४ :नेपाळ देशात भीषण विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रन वे पासून अवघ्या 10 सेंकद अलीकडे विमानाचा अपघात घडला. एटीआर- 72 हे प्रवासी विमान 72 जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते

परंतू, पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधीच हे विमान अपघातग्रस्त झाले, ज्यात विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

विमानाचा अपघात होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. विमानात 11 परदेशी पर्यटकांसह 3 नवजात मुले होती. अपघाताच्या वेळी विमानात 53 नेपाळी, 5 भारतीय, 4 रशियन, 1 आयरिश नागरिक, 2 कोरियन, 1 अर्जेंटिना आणि 1 फ्रेंच नागरिक होता, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे.