नागपूर, 09 : विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केली.
विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी विधानसभा सदस्य सर्वश्री चैनसुख संचेती, किशोर आप्पा पाटील, डॉ. राहुल पाटील, उत्तमराव जानकर, रामदास मसराम, समीर कुणावार, श्रीमती सरोज अहिरे यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे.
