Monday, December 22 2025 3:08 am
latest

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी बी फोरम समितीची सभा संपन्न

ठाणे, 12 – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा ठाणे टी बी फोरम समिती सभा दि. 9 जून, 2025 रोजी अशोक शिनगारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे डॉ. ए. एस. मुंजाळ यांनी ठाणे जिल्हा व महानगरपालिका ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, वसई विरार, मिरा भायंदर यांचा अहवाल सादर केला व कमी काम असलेल्या इंडिकेटर संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्याकरिता सूचविण्यात आले.
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रोहन गुघे यांनी ठाणे जिल्ह्याचे मिशन मोड मध्ये टी बी मुक्त अभियानाचे काम झाले पाहिजे अशा सूचना जिल्हा क्षयरोग अधिकारी ठाणे यांना दिल्या तसेच शक्ती व पी पी एस ए प्रकल्पा अंतर्गत बाकी राहिलेल्या संशयित क्षयरुग्णांची क्ष-किरण व थुंकी नमुने तपासणी करिता विशेष कृती आराखडा तयार करून सर्व क्षयरुग्णांची तपासणी करण्यात यावी, त्याचा प्रगती अहवाल पुढील सभेत सादर करावा अशा सूचना दिल्या.
सदरील सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे डॉ. गंगाधर परगे, शहर क्षयरोग अधिकारी उल्हासनगर, वैद्यकिय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व इतर महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.