Saturday, August 8 2026 8:13 pm

‘योग’ ही शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती – आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

यवतमाळ, 22 : योग ही केवळ कसरत नसून शरीर आणि मनाला ऊर्जा देणारी जीवनपद्धती असल्याचे मत आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.

‘आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त’ पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, माय युवा भारत कार्यालय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे भव्य सामूहिक योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात सहभागी होऊन त्यांनी योगासने केली. तसेच नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, प्रशासकीय अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.