Monday, December 22 2025 2:57 pm
latest

परभणी येथील नाट्यगृहाच्या कामाबाबत लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

मुंबई, 27 : परभणी येथील नाट्यगृहाचे बांधकाम हे निश्चितपणे पूर्ण केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, परभणी महानगरपालिकेस मूलभूत सोयीसुविधा विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात 1 हजार आसन क्षमतेच्या नवीन नाट्यगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देऊन 10 कोटी रुपये इतका निधी देण्यात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेने वातानुकूलन यंत्रणेसह विविध विद्युत कामे प्रस्तावित करुन त्यासाठी निधीची मागणी केली आहे. हे नाट्यगृह पूर्ण व्हावे, हीच राज्य शासनाची भूमिका असून याबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सदस्य नाना पटोले, सुरेश वरपूडकर, रवींद्र वायकर यांनीही यावेळी चर्चेत भाग घेतला.