Wednesday, April 1 2026 9:54 am

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा WIRC, ICAI येथे अभ्यास दौरा – वित्त क्षेत्रातील करिअर व AI वर विशेष मार्गदर्शन

ठाणे 11 – जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या एफ.वाय.बी.कॉम.च्या १४५ विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) येथे अकाउंटन्सी विभागामार्फत आयोजित करण्यात आला.
या अभ्यास भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वित्त क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः चार्टर्ड अकाउंटंट (CA) अभ्यासक्रमाची रचना, परीक्षा पद्धती, आर्टिकलशिप, तसेच जागतिक स्तरावर CA पदवीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए केतन सैय्या यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी चेअरमन यांच्या हस्ते महाविद्यालयातील खालील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला:
प्रा. सुभाष शिंदे (उपप्राचार्य),
डॉ. महेश पाटील (उपप्राचार्य),
सीए योगेश प्रसादे (विभागप्रमुख – अकाउंटन्सी विभाग),
श्री संजय पाटील (ऑफिस सुपरिंटेंडंट),
श्री पराग शिंदे (डेप्युटी रजिस्ट्रार).
या अभ्यास दौर्‍याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये वित्त आणि अकाउंटन्सी क्षेत्रामध्ये AI मुळे होत असलेले बदल, ऑटोमेशन आणि डेटा अॅनालिटिक्सचे वाढते महत्त्व, ऑडिट प्रक्रियेमध्ये AI चा वापर, तसेच भविष्यातील व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेली डिजिटल कौशल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. AI मुळे पारंपरिक अकाउंटिंग पद्धती अधिक वेगवान, अचूक आणि डेटा-आधारित होत असल्याचेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर ट्रेंड्स समजून घेण्यास मोठी मदत झाली.
याशिवाय विद्यार्थ्यांना WIRC मधील विविध कार्यप्रणाली व सुविधा यांची ओळख करून देण्यात आली. यामध्ये लायब्ररी, आयटी सेंटर तसेच ‘हॉल ऑफ फेम’ यांचा समावेश होता.
या संपूर्ण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यास दौरा अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि करिअर मार्गदर्शक ठरला.