Sunday, July 5 2026 10:51 am
latest

चंदगड तालुक्यात ११,३९४ हेक्टर जमीन फ्रीहोल्ड, ५४.११ लाखांची वसुलीही रद्द

विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

मुंबई, 3 : चंदगड तालुक्यातील ५५ गावांतील ११ हजार ३९४ हेक्टर जमीन आता फ्रीहोल्ड करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी ५४ लाख ११ हजार रुपयांची रक्कमही शासनाने रद्द केला असून या तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची, माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. महसूल विभागाच्या माध्यमातून १९५१ पासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा काढत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांचा त्यांच्या जमिनीवरील मालकी हक्क निश्चित होणार आहे. या निर्णयामुळे ५५ गावांतील सुमारे १२ हजार शेतकरी कुटुंबांची ११ हजार ३५३ हेक्टरहून अधिक जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची झाली असून, अनेक वर्षांपासूनचा वाद अखेर निकाली निघाला आहे.