Monday, December 22 2025 3:41 am
latest

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा

सातारा 17: चालू शैक्षणिक वर्ष शाळा प्रवेशोत्सवच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आंधळी ता. माण येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शैक्षणिक गुढी उभारून शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, अमर नलवडे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सातारा, प्रदीप शेंडगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती माण, चंद्रकांत खाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी, विजयकुमार कोकरे, अधिव्याख्याते -डाएट, लक्ष्मण पिसे, गटशिक्षणाधिकारी, साधना झणझणे, केंद्रप्रमुख आंधळी उपस्थित होते.

यावेळी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट, मोजे यांचे वाटप करण्यात आले. एक पेड़ माँ के नाम अंतर्गत मान्यवर व विद्यार्थी,पालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.