ठाणे,03:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GB ही नवीन मालिका साधारणतः दि.10 जुलै 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे.
अटींना अधीन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी दि.03, 04 व 07 जुलै 2025 रोजी अर्ज स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहित शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
